Thu, Aug 22, 2019 13:20होमपेज › Ahamadnagar › पद्मभूषण डॉ. विखे यांचे  20 डिसेंबरला पुण्यस्मरण

पद्मभूषण डॉ. विखे यांचे  20 डिसेंबरला पुण्यस्मरण

Published On: Dec 16 2017 1:38AM | Last Updated: Dec 16 2017 1:38AM

बुकमार्क करा

श्रीरामपूर : प्रतिनिधी

पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या हरिकिर्तनाचे आयोजन दि. 20 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता प्रवरानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रागंणात करण्यात आले आहे.

डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या संपूर्ण राजकीय, सामाजिक जीवनात जनसामान्यांशी जोडलेले नाते हे खूप महत्त्वपूर्ण होते. सामाजिक प्रश्‍नांबरोबरच या राज्याच्या शेती, सहकार, पाणी, शिक्षण, आरोग्य या सर्वच क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून स्वत:ची वेगळी वैचारिक भूमिका त्यांनी मांडली. 

नद्याजोड प्रकल्पाच्या संकल्पनेपासून ते खंडकरी शेतकर्‍यांच्या लढ्यामध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. डॉ. विखे पाटील यांचा सर्वच क्षेत्रात केलेल्या कार्याची आठवण म्हणून प्रथम पुण्यतिथी कार्यक्रमास नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक मान्यवर अभिवादन करण्यासाठी प्रवरानगर येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर येण्याची शक्यता आहे. प्रवरानगर येथील शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या हरिकिर्तनाचे नियोजन लोणी ग्रामस्थ आणि प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.