Mon, Nov 19, 2018 15:08होमपेज › Ahamadnagar › मुख्याधिकार्‍यांवर कारवाईसाठी उपोषण

मुख्याधिकार्‍यांवर कारवाईसाठी उपोषण

Published On: Dec 14 2017 1:43AM | Last Updated: Dec 13 2017 11:11PM

बुकमार्क करा

श्रीरामपूर : प्रतिनिधी

जनतेचे प्रश्‍न प्रलंबित ठेवून वरिष्ठ अधिकार्‍यांना खोटे अहवाल सादर करणार्‍या श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुमंत मोरे यांना निलंबित करावे, या मागणीसाठी येथील व्यावसायिक जगदीश तुकाराम शेटे पत्नीसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  आमरण उपोषणास बसले आहेेत. याबाबत थेटे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, नगरपालिकेने बोगस ठराव करून श्रीरामपुरातील मेनरोडवरील माझी टपरी दुकान क्र. 8 उपाध्ये यांच्या नावावर केले आहे. या अन्यायाविरोधात 29 एप्रिल 2017 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. या उपोषणाची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने वादग्रस्त दुकान व आजूबाजूच्या अतिक्रमित टपर्‍या काढून 20 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश श्रीरामपूर पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना दिले.

परंतु मुख्याधिकार्‍यांनी कोणतीही कारवाई केली नाही, म्हणून मी 25 मे रोजी पुन्हा उपोषण केले. चार दिवसांनंतर मुख्याधिकार्‍यांनी सदर टपर्‍यांचे अतिक्रमण काढण्याचा केवळ देखावा केला व पाचव्या दिवशी मुख्यधिकार्‍यांनी अतिक्रमण काढल्याचे तोंडी जिल्हा प्रशासनाला कळविले. सहाव्या दिवशी उपाध्ये यांनी न्यायालयातून तात्पुरती स्थगिती मिळविल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले, असे  भासविले. मुख्याधिकार्‍यांनी टपरीधारकांना मदत करून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यासाठी मदत केल्याचा आरोप थेटे यांनी केला आहे. अशा मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्यावर त्वरित कारवाई करावी,  या मागणीसाठी थेटे यांनी  उपोषण सुरू केले आहे.