होमपेज › Ahamadnagar › श्रीपाद छिंदम पुन्हा तडीपार

श्रीपाद छिंदम पुन्हा तडीपार

Published On: Apr 25 2018 12:55AM | Last Updated: Apr 24 2018 11:19PMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेल्या माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याला पुन्हा नगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. मंगळवारपासून (दि. 24) आठ दिवस त्याला जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

बुधवारी (दि.25) शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे नगरच्या दौर्‍यावर आहेत. त्यावेळी छिंदम हा शहरात वास्तव्यास राहिल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी त्याला नगर जिल्ह्यातून 8 दिवसांसाठी तडीपार करण्यात यावे, असा प्रस्ताव तोफखाना पोलिसांनी प्रांताधिकार्‍यांकडे पाठविला होता. प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी मंगळवारी सकाळी हा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानंतर पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दुपारी छिंदम याला तडीपारीची नोटीस बजाविली आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर त्याला 15 दिवसांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. आता पुन्हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न लक्षात घेऊन छिंदम याला आठवड्यासाठी तडीपार करण्यात आले आहे.

Tags : Ahmadnagar, Shripad Chindam, out, area, once, again