Thu, Nov 15, 2018 22:09होमपेज › Ahamadnagar › छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 2:28AMनगर : प्रतिनिधी

उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबदृल केलेल्या वक्तव्याचे  सर्वत्र तीव्र पडसाद उमटले. त्यांच्या वक्तव्याची क्लीप  व्हायरल होताच शहरभरात संतापाची तीव्र लाट उसळली. छिंदम यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शहर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवप्रेमी संघटनांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. छिंदम यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले. कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि छिंदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणांनी परिसर दणाणला होता.

महापालिकेचे उपमहापौर छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचे समजताच, शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, शहर जिल्हा काँग्रेस व विविध शिवप्रेमी संघटना तात्काळ एकवटल्या. जुन्या बसस्थानकाजवळील शिवाजी महाराज पुतळ्यापासून निषेध मोर्चास प्रारंभ केला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येताच शिवाजीमहाराजांच्या जयजयकाराच्या घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. 

या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. या  सभेत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, माजी महापौर अभिषेक कळमकर, कुमार वाकळे, बाळासाहेब पवार, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, बाळासाहेब भुजबळ, निखिल वारे, उबेद शेख तसेच संजय झिंजे, दीपक सूळ, सीताराम काकडे, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, शिवप्रहारचे संजीव भोर, यशस्वी ब्रिगेडच्या रेखा जरे आदींनी छिंदम यांच्यावर जोरदार टीका करत, त्यांनी तात्काळ उपमहापौरपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. 

संबंधित बातम्या : 

मुख्यालये सोडू नका

पाथर्डीत एसटी बसच्या काचा फोडल्या

शिवरायांबाबत उपमहापौरांचे आक्षेपार्ह वक्तव्य!

सकल मराठा समाजाने केला छिंदम यांचा निषेध

छिंदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

उपमहापौरांचे घर, ऑफीसवर दगडफेक!

शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत(व्हिडिओ)

नगर : उपमहापौरांच्या घरावर दगडफेक; तणाव (video)

उपमहापौरांना मनपात पाय ठेवू देणार नाही

वकील संघटनेकडून आज कोर्टातील कामकाज बंद

विरोध असूनही गांधींनी प्रतिष्ठा पणाला लावली!