Mon, Jul 15, 2019 23:43होमपेज › Ahamadnagar › नगर: छिंदमची रवानगी सबजेलमध्ये!

नगर: छिंदमची रवानगी सबजेलमध्ये!

Published On: Feb 17 2018 9:34AM | Last Updated: Feb 17 2018 9:34AMनगर: प्रतिनिधी

शिवजयंतीबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदम याची रवानगी सबजेलमध्ये करण्यात आली आहे. शनिवारी न्यायालय आवारात होणारी गर्दी लक्षात घेऊन सकाळी लवकरच न्यायालयीन कामकाज आटोपण्यात आले. 

वाचा : नगर:शिवजयंतीबद्दल उपमहापौरांचे आक्षेपार्ह वक्तव्य

छिंदम याच्या वक्तव्यावरून नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने न्यायालय आवारात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. ही बाब लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने गांधीगिरी केली. सरकारी वकिलांच्या माध्यमातून पोलिस प्रशासनाने न्यायालयाकडे सकाळी लवकर कामकाज घेण्याची विनंती केली. ही बाब अतिशय गोपनीय ठेवण्यात आली. त्यानुसार सकाळी लवकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, तोफखानाचे निरीक्षक सुरेश सपकाळे आदींनी निवडक कर्मचार्‍यांच्या बंदोबस्तात छिंदम याला न्यायालयात आणले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर तात्काळ त्याला सबजेलमध्ये हलविण्यात आले.

वाचा संबंधित बातम्या
छिंदमवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
विरोध असूनही खासदार गांधींनी प्रतिष्ठा पणाला लावली!