होमपेज › Ahamadnagar › छिंदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

छिंदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 12:36AMजामखेडः  प्रतिनिधी 

भाजपाचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेधार्थ जामखेडमधील शिवसेना शहर शाखा तसेच विविध संघटनांच्या वतीने शहरात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. 

सुरूवातीला जामखेड शहर शिवसेना शहरप्रमुख संजय काशीद यांच्या नेतृत्वाखाली  सकल मराठा समाज, विविध संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व रासप पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बस स्थानकासमोरुन निषेध रॅलीला सुरुवात केली. खर्डा चौकात उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या फोटोला जोडो मारुन विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.  तहसील कार्यालयासमोर व पोलिस स्टेशन समोर निषेधाच्या घोषणा देऊन उपमहापौर छिंदम याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली. पोलिस निरीक्षक नितीन पगार यांना निवेदन देण्यात आले. 

या वेळी शिवसेना शहरप्रमुख संजय काशीद, प्रा. मधुकर राळेभात, मंगेश आजबे, संभाजी मुळे, कुंडल राळेभात, नगरसेवक अमित जाधव, नामदेव राळेभात,पांडुराजे भोसले, सिध्दार्थ घायतडक, पप्पू साळुंके, नगरसेवक पवन राळेभात आदींसह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.