Fri, Jul 19, 2019 17:43होमपेज › Ahamadnagar › श्रीगोंदा : पाच वाहनांचा विचित्र अपघात. 

श्रीगोंदा : पाच वाहनांचा विचित्र अपघात. 

Published On: Dec 21 2017 5:31PM | Last Updated: Dec 21 2017 5:31PM

बुकमार्क करा

श्रीगोंदा- प्रतिनिधी 

नगर- पुणे मार्गावर बेलवंडी फाटयानजिक आज (२१) सायंकाळी ५ वाजता पाच वाहने एकेमकाना धडकली. या अपघातात या पाचही वाहनाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. 

याबाबत प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार , नगर- पूणे मार्गावर बेलवंडी फाट्यानजिक नगरहुन  पुण्याकड़े जाणाऱ्या रस्त्यावर मारुती स्विफ्ट गाडीला एक दुचाकीस्वार अचानक आडवा आल्याने वाहनचालकाने ब्रेक दाबत वाहन थांबविले. यामुळे मागून येणाऱ्या  चार वाहन चालकाना आपल्या वाहनावरील वेग नियंत्रित करता न आल्याने ही चारही वाहने एकमेकावर आदळली. या अपघातात चारही वाहनांचे नुकसान झाले. मात्र या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान अपघातामध्ये एक रुग्नवाहिका रुग्ण घेऊन जात होती. अपघात झाल्याने काही काळ या रस्त्यावरील वाहतुक खोळबली होती.