Mon, Apr 22, 2019 04:07होमपेज › Ahamadnagar › आ. कर्डिले-नाना पटोले यांच्यामध्ये झाले गुप्तगू 

आ. कर्डिले-नाना पटोले यांच्यामध्ये झाले गुप्तगू 

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 12:44AMराहुरी : प्रतिनिधी 

भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन काँगे्रसमध्ये डेरे दाखल झालेले खा. नाना पटोले व भाजपाचे विद्यमान आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यामध्ये काल राहुरी येथील आमदार कार्यालयात बंद खोलीत चर्चा झाल्याने राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर सत्ताधारी भाजपामध्ये बंडखोरी करीत खा. नाना पटोले यांनी काल शिर्डी येथे जाऊन साईदर्शन घेतले. शिर्डी येथून परतताना पटोले यांनी राहुरी येथे सायंकाळी 5 वाजता आ. शिवाजी कर्डिले यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी पटोले यांचा आ. कर्डिले यांनी मोठ्या सन्मानाने स्वागत करून त्यांचा सत्कार केला. यावेळी बंद खोलीमध्ये काहीवेळ पटोले व आ. कर्डिले यांची गुप्तगू झाल्याची चर्चा आहे.  दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झडत आहेत. 

भाजपातून बंडखोरी केल्यानंतर पक्षात नाराज असलेल्या नेत्यांच्या भेटी घेण्याचा नाना पटोले यांचा धडाका सुरू आहे. कालच्या शिर्डी दौर्‍यात त्यांच्यासोबत भाजपाचे दोन आमदार असल्याचीही चर्चा होती. त्यातच काही दिवसांपासून ना. राधाकृष्ण विखे व आ. कर्डिले यांच्यातील वाढती जवळीक पाहता कालची नाना पटोलींची भेट राजकीय नेत्यांचे लक्ष वेधणारी आहे.