Wed, Apr 24, 2019 00:11होमपेज › Ahamadnagar › दिल्लीत भव्यदिव्य शिवजयंती : खा. भोसले

दिल्लीत भव्यदिव्य शिवजयंती : खा. भोसले

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 12:39AMबेलापूर : वार्ताहर

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव व कार्यकर्तृत्व सर्वत्र आहेच. ते अबाधित ठेवण्यासाठी आपण झटत राहणार असून येत्या 19 फेब्रुवारी रोजी दिल्लीत भव्यदिव्य शिवजयंती उत्सव साजरा करणार असल्याची माहिती खा.संभाजीराजे भोसले यांनी दिली.

बेलापुरात डॉ. रविंद्र महाडीक व विक्रम महाडीक यांनी उभारेल्या सह्याद्री फॅमिली गार्डन रेस्टॉरंटच्या  उद्घाटनासाठी आले असता बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. भाऊसाहेब कांबळे, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, शिवशाहीर विजय तनपुरे, रावसाहेब खेवरे, सिद्धार्थ मुरकुटे, अप्पासाहेब कदम, संजीव भोर, सुनिल मुथ्था, शरद नवले, गणेश भांड, दशरथ गव्हाणे, सोमनाथ नवले, डॉ. रविंद्र महाडीक, विक्रम महाडीक, अर्जुन महाडीक आदी मान्यवर उपस्थित होते. 

खा. भोसले म्हणाले, मराठी तरुणांनी आता व्यवसायातही उतरले पाहिजे. व्यवसाय करताना इतरांचा आदर्श घेऊन सचोटीने, जिद्दीने व्यवसाय केला पाहिजे. मराठी युवकांच्या पाठिशी आपण उभे असून, त्यांना प्रोत्साहन, प्रेरणा देण्यासाठी आपण आलो आहोत. छत्रपतींबद्दल जाणीवपूर्वक अनेक गैरसमज केले जातात. परंतु छत्रपती सर्वांना बरोबर घेत होते. त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. 

दरम्यान, छत्रपती संभाजीराजेंचे बेलापुरात ग्रामपंचायतीच्यावतीने स्वागत करण्यात आले. नदी घाटापासून पारंपारिक वाद्यांच्या निनादात घोडे व इंग्लड मेड बग्गीतून भव्यदिव्य राजेशाही मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी बेलापूर परिसर दुमदुमुन गेला होता. त्यांच्या दर्शनाचा क्षण टिपण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. उपस्थितांचे स्वागत विश्‍वास महाडीक यांनी केले. प्रास्ताविक बाबासाहेब कदम यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्‍वर गवले यांनी तर आभार डॉ. रविंद्र महाडीक यांनी मानले.