Sun, Jul 21, 2019 01:43होमपेज › Ahamadnagar › शिर्डीत आदित्य ठाकरेंचा विद्यार्थ्यांशी संवाद

शिर्डीत आदित्य ठाकरेंचा विद्यार्थ्यांशी संवाद

Published On: Dec 20 2017 1:38AM | Last Updated: Dec 20 2017 12:34AM

बुकमार्क करा

शिर्डी : प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी युवासेनेच्या माध्यमातून वर्चुअल क्लासरूम ही योजना राबविण्यासाठी शिर्डी येथे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी काल साईनगरच्या मैदानावर संवाद साधला.

याप्रसंगी खा. हेमंत गोडसे, खा. सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, विश्‍वस्त अमोल कीर्तीकर, अमेय घोले, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश शिंदे, शहराध्यक्ष संजय शिंदे, कमलाकर कोते, नाना बावके, विजय काळे, विजय जगताप, नगरसेविका अनिता जगताप, सचिन कोते, दीपक पंडित आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे कमी करायचे असेल, तर ते ुुु.ीहर्ळीींशपरीेिींलेीशी.लेा या वेबसाईटवर जाऊन शिक्षण घेऊ शकतात. ही योजना इयत्ता 8 वी, 9 वी व 10 वीच्या मुलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणीची गरज भासणार नाही.  ही योजना मुंबई महानगरपालिकांच्या 480 शाळांत यशस्वी झाल्याने ही राज्यातही पसरावी, यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे काढत आहोत. यासाठी महाराष्ट्र राज्य महामंडळाने जो अभासक्रम दिला आहे, त्याच धर्तीवर ही साईट तयार करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. 
दरम्यान, कार्यक्रमाला येणास उशीर झाला म्हणून जाहीर माफी मागून त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात घर केले.