Sun, Jul 21, 2019 14:59
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › शिर्डीतील अतिक्रमण जमिनदोस्त

शिर्डीतील अतिक्रमण जमिनदोस्त

Published On: Mar 08 2018 1:49AM | Last Updated: Mar 07 2018 10:53PMशिर्डी : प्रतिनिधी

साईबाबा संस्थानच्या वाढीव रुग्णालयासाठी आरक्षित करण्यात आलेली आरक्षण क्रमांक 34 हे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये प्रांताधिकार्‍यांनी बुधवारी सकाळी  7 वाजेपासून नांदुर्खी रस्त्यालगत असणार्‍या पाण्याच्या टाकीजवळील संतनगरमधील हा भाग जमीनदोस्त करण्यात आला.

यासाठी प्रांताधिकार्‍यांनी अतिक्रमणधारकांना सहा महिन्यांच्या आत राहते घरे खाली करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. यावर काही अतिक्रमणधारकांनी घरे खाली करून दिली होती. मात्र, सुमारे 9 अतिक्रमणधारकांनी घरे खाली केली नव्हती. त्यामुळे प्रांत कार्यालयाने शिर्डी नगरपंचायत, शिर्डी पोलिस ठाण्याच्या सहकार्याने येथील अतिक्रमण हटविले.  यासाठी नगरपंचायतीचे 35 कर्मचारी, पोलिस दलाचे 25 अधिकारी, 100 पोलिस असा फौजफाटा याठिकाणी दाखल झाला होता. चार जेसीबी मशीन व एक ट्रॅक्टरने अतिक्रमण काढण्यात आले होते. या प्रक्रियेत अतिक्रमणधारकांनी सहकार्य केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्याचप्रमाणे पालखी रस्ता ते नवीन पिंपळवाडी रस्त्याच्या दरम्यानही काही लोकांनी आपली अतिक्रमणे काढली आहेत.  ज्यांनी काढली नाहीत, त्यांच्यावर प्रशासन कारवाई करीत आहे.

या मोहिमेत प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, सागर पाटील, तहसीलदार माणिकराव आहेर, नायब तहसीलदार राहुल कोताडे, मुख्याधिकारी सतीश दिघे, पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे आदींसह पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.