Tue, Jul 16, 2019 10:09होमपेज › Ahamadnagar › दरोडेखोरांनी मोडले चौघांचे हातपाय

दरोडेखोरांनी मोडले चौघांचे हातपाय

Published On: Feb 11 2018 12:53AM | Last Updated: Feb 10 2018 11:59PMशेवगाव : प्रतिनिधी 

शेवगाव तालुक्यात हातगाव मुंगी शिवारातील दोन वस्त्यांवर दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत सातजण जखमी झाले असून, चारजणांचे हातपाय मोडल्याने त्यांना शेवगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  दोन्ी ठिकाणाहून दरोडेखोरांनी जवळपास साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे ही घटना शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास घडली. हातगाव व मुंगी सीमेवर चारी नं.9 च्या लगत राहणार्‍या बर्गे वस्तीवर दरोडेखोरांनी काठ्या, गज, कुर्‍हाड, कोयता अशा हत्यारांनी  काल पहाटे दीडच्या सुमारास हल्ला चढविला. पडवीत झोपलेले दत्तात्रय बापूसाहेब बर्गे (49) व त्यांच्या पत्नी मंदा दत्तात्रय बर्गे (45, रा. हातगाव) यांना जबर मारहाण केली. 

या मारहाणीत त्यांचे हातपाय मोडले आहेत. नंतर घरात घुसून नानासाहेब अशोक बर्गे यास मारहाण केली व त्याच्या गळ्याला चाकू लावून आरडाओरड न करण्याची धमकी दिली. घरात उचकापाचक करून गळ्यातील पोत, झुंबर असे 5 तोळे सोन्याचे दागिने, 9 हजार रुपये रोख रक्कम, तीन मोबाईल, घड्याळ असा ऐवज लांबविताना बर्डे कुटूबांला घरात कोंडून ठेवले. त्यानंतर तेथून अर्धा किलोमीटर अंतरावर असणार्‍या गादे वस्तीकडे दरोडेखोरांनी आपला मोर्चा वळविला. तेथे पडवीत झोपलेले देविदास साहेबराव गादे (49), त्यांच्या मुलीची सासू सिंधुबाई कुडंलिक चेडे (55 रा. भाविनिमगाव), साहेबराव किसन गादे (70), गयाबाई देविदास गादे (45) यांना मारहाण केली. यात देविदास गादे यांचा हात मोडला. तर सिंधुबाई चेडे यांच्या बांगड्या व कर्णफुले ओरबडताना  कानाला जबर मार लागला. 

घरात दरोडेखोरांची उचकापाचक सुरू असताना आरडाओरड झाल्याने लगतच्या वंजारी वस्तीवरील रहिवाशी जागे झाल्याचे पाहून दरोडेखोर  पळून गेले. येथूनही त्यांनी  ळ्यातील पोत, कर्णफूले असे 4 तोळे सोन्याचे दागिने, 5 हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल असा ऐवज चोरुन नेला  आहे.  दरोडेखोरांच्या मारहाणीत जबर जखमी झालेले देविदास गादे, सिंधूबाई चेडे, दत्तात्रय बर्गे व मंदा बर्गे यांना शेवगाव येथील खासगी रुगणालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी शासनाच्या 108 रुग्णवाहिकेशी फोनवरून संपर्क केला. मात्र, ही रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. 

दरम्यान, 20 ते 22 वयोगटातील 8 ते 9 दरोडेखोर असल्याची माहिती जखमींनी दिली. या दोन वस्त्यांवरून दरोडेखोरांनी जवळपास 3 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. मात्र, पोलिसांनी अज्ञात 4 चोरांविरुद्ध 72 हजारांचाच ऐवज चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अपर पोलिस अधीक्षक घनशाम पाटील, उपविभागीय अधिकारी अभिजीत शिवथरे, प्रशिक्षणार्थी अधिकारी पौर्णिमा तावरे, गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी श्वान पथक, ठसे तज्ज्ञ पथकालाही पाचारण करण्यात आले होते.