Fri, Jul 19, 2019 20:36होमपेज › Ahamadnagar › शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मारली बाजी !

शेवगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मारली बाजी !

Published On: Dec 28 2017 1:55AM | Last Updated: Dec 28 2017 1:55AM

बुकमार्क करा
शेवगाव : प्रतिनिधी

तालुक्यात दुसर्‍या टप्यात झालेल्या दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठी लोकसंख्या असलेल्या तीन गावांवर भाजपने वर्चस्व मिळवले असून जनशक्ती मंचनेही एका गावात विजय मिळवत खाते उघडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सहा ठिकाणी बाजी मारली आहे. या निवडणुकीत आपआपले गड राखण्यात प्रस्थापितांना बर्‍याच प्रमाण यश मिळवले असले तरी बोधेगाव व मुंगीमध्ये सत्तांतर झाले आहे. बोधेगाव येथे निवडणुकीच्या कारणामुळे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने बंद पाळण्यात आला. तेथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण वातावरण आहे. 
बोधेगाव व बालमटाकळीत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले. माजी जि. प. सदस्य नितीन काकडे गटाने सरपंचपदासह 11 जागा जिंकल्या.

बालमटाकळीत भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान सरपंच तुषार वैद्य यांच्या गटाला सरपंचपदासह 11 जागा मिळाल्या. शहरटाकळीत राष्ट्रवादीच्या दोन गटातच लढत झाली. तेथे शिवाजी गवळी यांच्या गटाने सरपंचपदासाह आठ जागा मिळविल्या. खरडगाव येथे बाजार समितीचे माजी उपसभापती विष्णू बोडखे यांच्या गटाकडे सरपंच पदासह पाच जागा मिळाल्या. कर्‍हेटाकळीत एकाकी लढत देत आपला बालेकिल्ला राखण्यात माजी सरपंच शफीक सय्यद यांना यश मिळाले. ढोरसडे-अंत्रे व हिंगणगाव ने या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या दोन गटांतच लढती झाल्या. मुंगीत राष्ट्रवादीचे निशिकांत राजेभोसले व भाजपच्या एका गटाने युती केली होती. त्यांच्या गटाला सरपंचपदासह 9 जागा मिळाल्या. वरुरमध्ये विद्यमान सरपंच भागवत लव्हाट यांच्या पत्नी मनिषा लव्हाट विजयी झाल्या. भगुरला जनशक्ती मंचच्या कार्यकर्त्यांतच लढत झाली. तेथे जनशक्तीचे वैभव प्रदीप पुरनाळे निवडून आले. 

ग्रामपंचायत व विजयी उमेदवार असे : बोधेगाव - सरपंच - सुभाष पवळे, ग्रा.पं. सदस्य - प्रकाश गर्जे, महादेव घोरतळे, मनिषा काशिद, सुनिल काशिद, उषा घोरतळे, विश्‍वनाथ कुढेकर, प्रिती अंधारे, विद्या ढवन, फिरोजखान पठाण,  स्नेहल खंडागळे, इंदूबाई मिसाळ, सदानंद गायकवाड, रमजू उस्मान पठाण, अश्‍विनी गुंजाळ, नितीन काकडे, ललिता चव्हाण व छबुबाई अकोलकर. बालमटाकळी-सरपंच-कौसल्या माणिक कवडे. सदस्य- तुषार वैद्य, हिराबाई घोरपडे, सुनंदा बामदळे, शहानजबी शेख, संतोष घोरपडे, अरुण बामदळे, रमा भोंगळे, धनंजय देशमुख, दुर्योधन काळे, शितल घुले, सारीका धाडगे, योगेश गरड, आशा घरजने व शोभा सौंदर. मुंगी - सरपंच - दादासाहेब भुसारी. सदस्य - गुलाब गव्हाणे, विठ्ठल रक्टे, शकुंतला कटारीया, प्रदीप काटे, गयाबाई गरड, हिराबाई अदमाने, अहमद चाँद, अनिता सुरवसे, भागवत देवढे, भैय्यासाहेब दसपुते, बेबीताई गायकवाड, नितीन घोरपडे, अंजना बल्लाळ, मिराबाई घोरपडे व मंगल जाधव.

वरुर - सरपंच - मनिषा लव्हाट. सदस्य - बाबासाहेब म्हस्के, गोपाळ खांबट, शारदा म्हस्के, अर्जुन तुजारे, गयाबाई गरुड, रमेश वावरे, गोदावरी सोनटक्के, निर्मला म्हस्के, सुरेश वावरे, दामिनी कर्डीले व शमिना पठाण. भगुर - सरपंच - वैभव पुरनाळे. सदस्य - बेबीताई गंगावणे, दीपक पुरनाळे, प्रसाद गरुड, शिवाजी जायभाये, शारदा साबळे व शुभांगी साबळे आणि लताबाई मुरदारे दोघी बिनविरोध.
शहरटाकळी - सरपंच - अलका शिंदे. सदस्य - छाया मिसाळ, रामआप्पा गिरम, उषाबाई मडके, महेश भालेराव, राजेंद्र खंडागळे, हिराबाई राऊत, राजेंद्र चव्हाण, शांता कोल्हे, सुनंदा गवळी, सुनिल गवळी व हिराबाई खंडागळे. खरडगाव - सरपंच - योगिता बोडखे. सदस्य - मल्हारी लवांडे, सुनिता बोडखे, जया लबडे, मच्छिंद्र आमटे, दिनकर सरसे, परविन शेख, सुनिल बोडखे, अंतिका घोरपडे, संगिता झिरपे,

विक्रम लबडे व भाग्यश्री बोडखे.  कर्‍हेटाकळी - सरपंच - सय्यद शफीक. सदस्य - विजय ससाणे, सरस्वती ससाणे, शारदा ससाणे, विष्णू राठोड, विनायक गटकळ, ज्योती गटकळ तसेच छाया अंधारे, कमल कटे, संतोष लेंडाळ (तिघे बिविरोध). ढोरसडे - अंत्रे - सरपंच - सारीका वाघमारे. सदस्य - निवृत्ती ढोंबरे, जनार्दन माळवदे, गोकुळदास निकम, ज्ञानदेव निमसे, मधुरा खिलारे, तसेच रुख्मिनी पवार, सरस्वती ठोंबळ, सुनिता ठोंबळ व शांदाबाई माळवदे (चार बिनविरोध). हिंगणगाव- ने - सरपंच - वर्षा पवार. सदस्य - बबन पवार, रुपाली आहेर, विनोद पवार, अनिता पवार, अजित पवार, रेखा पवार व मंदाबाई म्हस्के.