होमपेज › Ahamadnagar › सोनईत बिबट्याकडून दोन कालवडींचा फडशा

सोनईत बिबट्याकडून दोन कालवडींचा फडशा

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 30 2017 11:18PM

बुकमार्क करा
शनिशिंगणापूर : वार्ताहर

सोनई गावालगतच असलेल्या घोडेगाव रस्त्यावरील बजरंगनगर, गडाख वस्तीत कुंडलिक नामदेव गडाख यांच्या घरासमोरील गोठ्या बाहेर बांधण्यात आलेल्या दोन तेरा महिन्यांच्या कालवडींवर बिबट्याने मध्यरात्री दोनच्या सुमारास हल्ला करुन त्यांचा फडशा पाडला. दोन्ही जनावरे सकाळी मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. यात गडाख यांचे तीस हजारांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी वनअधिकारी ढेरे, जाधव, डॉ. मेहेत्रे यांनी भेट देऊन पंचनामा केला. पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली.

आजूबाजूला उसाचे मोठे पीक असल्याने त्यात महिन्यापासून वीज पुरवठा खंडित झाल्याने परिसरात अंधार असतो. अंधाराचा फायदा घेत बिबट्याचा या परिसरात ठिकठिकाणी संचार आहे. गडाख यांना नुकसान भरपाई देण्यासह बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची व विद्युत पुरवठा चालू करण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. दरम्यान बिबट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.