Tue, Jun 25, 2019 15:49होमपेज › Ahamadnagar › बारबालांच्या माध्यमातून सेक्स रॅकेट

बारबालांच्या माध्यमातून सेक्स रॅकेट

Published On: Jan 12 2019 1:29AM | Last Updated: Jan 11 2019 11:42PM
नगर : प्रतिनिधी

मुंबईतील बारबालांच्या माध्यमातून महावीरनगर (सावेडी) सेक्स रॅकेट चालविले जात असल्याचे उघडकीस आले आहे. रॅकेट चालविणारी आरोपी रिंकी शर्मासह ग्राहक संतोष भुजबळ व भास्कर ठोंबे या तिघांना अटक करण्यात आली आहे.

महावीरनगरमधील ‘रत्नप्रभा’ नावाच्या बंगल्यामध्ये सेक्स रॅकेट चालविले जात होते. तोफखाना पोलिसांनी गुरूवारी (दि.10) छापा टाकून हे रॅकेट उघडकीस आणले. रिंकू मनोहरलाल शर्मा (वय 29, रा. महावीरनगर, सावेडी) ही तीन मुलींच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवित होती. दोन मुली बंगाली तर एक मुलगी तागडवस्ती भागातील रहिवाशी असल्याचे उघडकीस आले आहे. बंगाली मुली मुंबईतील डान्सबारमध्ये पूर्वी काम करत होत्या. डान्स बारचे नियम कडक झाल्याने या मुली राज्यात विखुरल्या गेल्या. सेक्स रॅकेट चालविणारे या मुलींना एक महिन्यासाठी घेऊन येत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

या दोन्ही पीडित मुलींची रवानगी मुंढवा (पुणे) येथील महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळेस ग्राहक म्हणून आलेले संतोष अर्जुन भुजबळ (वय 35, रा. माका, नेवासा) आणि भास्कर राजाराम ठोंबे (वय 38, रा. साईनगर, बोल्हेगाव) या दोघांना अटक करण्यात आले आहे.