Tue, Mar 19, 2019 03:24होमपेज › Ahamadnagar › केडगाव दगडफेक : शिवसैनिकांवरील कलम ३०८ वगळले!

केडगाव दगडफेक : शिवसैनिकांवरील कलम ३०८ वगळले!

Published On: May 04 2018 1:54AM | Last Updated: May 03 2018 11:16PMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडानंतर तणाव निर्माण होऊन घडलेल्या दगडफेक प्रकरणी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह 600 शिवसैनिक, पदाधिकार्‍यांवर दाखल गुन्ह्यातील कलम 308 अखेर वगळण्यात आले आहे. मात्र, 324, 336 व 337 ही तीन कलमे वाढविल्याबाबत न्यायालयात तपासी अधिकार्‍यांनी अहवाल दिला आहे. दरम्यान, 308 कलम हटविल्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य कमी झाले आहे.

हत्याकांडाच्या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेला हिंसक वळण लागले. यावेळी पोलिस अधिकार्‍यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून दगडफेक करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच परिसरातील दुकानांची तोडफोड, पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाल्या प्रकरणी सहाय्यक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. मात्र, अद्यापपर्यंत कलम वगळण्यात आले नव्हते. कलम 308 हे गंभीर स्वरुपाचे असल्याने या गुन्ह्यात जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करावा लागणार होता.