Thu, Apr 25, 2019 21:47होमपेज › Ahamadnagar › दुहेरी हत्याकांडातील आरोपीवर दुसरा गुन्हा

दुहेरी हत्याकांडातील आरोपीवर दुसरा गुन्हा

Published On: May 17 2018 1:37AM | Last Updated: May 17 2018 12:04AMजामखेड : प्रतिनिधी

राळेभात बंधूंच्या दुहेरी हत्याकांडातील प्रमुख आरोपी गोविंद गायकवाड याच्यासह त्याच्या नातलगांनी तालुक्यातील तेलंगसी या गावात 20 मार्च रोजी गॅबीसाहेब पिराचे यात्रेत रात्री हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली होती. तेलंगसीचे सरपंच सुभाष जायभाय यांनी दोन महिन्यानंतर 15 मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जामखेड पोलिसांत तेलंगसी गावचे सरपंच सुभाष निवृत्ती जायभाय (वय 56) यांनी दि. 15 रोजी जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दिली की, 20 मार्च रोजी तेलंगसी गावातील वेशीजवळील चौकात गॅबीसाहेब पिराचे यात्रेतील ऊरूसाच्या मिरवणुकीत आरोपी गोविंद उर्फ स्वामी दत्तात्रय गायकवाड नाचत असताना त्याने त्याच्या जवळील गावठी पिस्तुलातूून हवेत गोळीबार करून मी या गावचा दादा आहे, असे म्हणून इतर आरोपी गोरख दत्तात्रय गायकवाड (गोविंदचा भाऊ) व दत्तात्रय रंगनाथ गायकवाड (गोविंदचा वडील) यांनी नाचत गोविंद गायकवाडचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही, त्याने कसा फायर केला असे बोलून दहशत करून चारचाकी गाडीतून निघून गेले, अशी फिर्याद सुभाष जायभाय यांनी दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आर्म अ‍ॅक्ट व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.