Mon, May 27, 2019 08:41होमपेज › Ahamadnagar › उमेदवारी अर्जांची आज होणार छाननी                   

उमेदवारी अर्जांची आज होणार छाननी                   

Published On: May 14 2018 1:42AM | Last Updated: May 14 2018 12:29AMनगर : प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे 75गावांतील राजकीय वातावरण तापले आहे. सरपंचपदासाठी एकूण 498 तर सदस्यपदासाठी 1 हजार 847 अर्ज दाखल झाले आहे. शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी तब्बल 271 तर सदस्यपदासाठी 992 अर्ज दाखल झाले. आज उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 16 मे असून, याच दिवशी गावागावांतील निवडणूक चित्र स्पष्ट होणार आहे.

तालुक्यातील वडगाव गुप्‍ता ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 6 तर सदस्यपदासाठी 47 अर्ज दाखल झाले आहेत. राहाता तालक्यातील चितळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 10 तर सदस्यपदासाठी 32 अर्ज दाखल झाले आहेत. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूरसह 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या अकरा ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी 67 तर सदस्यपदासाठी 322 अर्ज आले आहेत. शेवगाव तालुक्यातील 11 गावांत निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे. सरपंचपदासाठी 63 तर सदस्यपदासाठी 283 अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील  कान्हूरपठार, बारागाव नांदूर, चितळी, लोणी व्यंकनाथ, मुकिंदपूर, वडगाव गुप्‍ता, ब्राम्हणी व देसवंडी आदींसह 75 गावांतील राजकीय वातावरण तापले आहे. सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने, या निवडणुकील अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळे गावागावांत बैठका, प्रचार आणि सायंकाळच्या पार्ट्यांना ऊत आला आहे.