Thu, Apr 25, 2019 16:12होमपेज › Ahamadnagar › एक लाख मुलींना सॅनिटरी पॅड 

एक लाख मुलींना सॅनिटरी पॅड 

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 13 2018 11:15PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

निर्भया एक पाऊल बदलाकडे या विद्यार्थ्यांच्या गटाने हाती घेतलेल्या मिशन-100000 या अंतर्गत प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील एक लाख मुलींना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला असून लोहारे येथे या मोहिमेचा प्रारंभ  करण्यात आला.

प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय हे नेहमीच महाविद्यालयातील विद्यार्थांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विकासावर भर देत असते. त्यातीलच एक म्हणजे समाजसेवा. त्यानुसार प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील निर्भया-एक पाऊल बदलाकडे यांच्या मिशन-100000 अंतर्गत पहिल्या टप्प्यातील  सॅनिटरी पॅडचे वाटप लोहारे येथे सरपंच रुपालीताई बाबासाहेब दुशिंगे, प्रवरा   अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यशवंत खर्डे, प्रा. संजय गलांडे, प्रा. सतीश शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. 

निर्भया हा गट मागील दोन वर्षांपासून महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण यासाठी काम करत आहे. या  आधीही या गटातील मयूर गायकवाड या विद्यार्थ्याला पिलर्स ऑफ नवभारत यूथ अवॉर्ड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व मानव संसाधन मंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांच्या उपस्थितीत आणि महिला व बालविकास मंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रतिभा पाटील व मयूर गायकवाड यांनी महिलांना येणार्‍या पाळी व ब्रेस्ट कॅन्सरबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. व गैर समजुतीबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर निर्भया ग्रुपमधील राहुल गोरडे, प्रज्ञा औटी, गणेश देवगिरी, ऋषिकेश शिरसाठ, योगेश गोरडे, प्रफुल्ला आहेर या विद्यार्थ्यांनी जनजागृती केले.

Tags : Ahmadnagar, Sanitary, pad, one, lakh, girls