होमपेज › Ahamadnagar › मोटारसायकलवरून घसरून कालव्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू

मोटारसायकलवरून घसरून कालव्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू

Published On: Aug 22 2018 6:26PM | Last Updated: Aug 22 2018 6:26PMसंगमनेर : प्रतिनिधी 

ओझर बुद्रुक येथील एका तरुणाचा  मोटारसायकलवरून घसरून  प्रवरा उजव्या कालव्यात पडल्याने  बुडून दुर्दवी मृत्यू झाला. ही घटना  बुधवारी सकाळी घडली. राहुल दत्तू  वर्पे असे कालव्यात बुडून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे 

याबाबत आश्वि पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, आज बुधवारी राहुल हा सकाळी आपल्या मोटार सायकलवरून शेताकडे गेला होता. शेतकडून माघारी घराकडे जात असताना ओझर येथील स्मशानभूमी जवळ असलेल्या जुन्या पुलाशेजारी येताच, राहुलची मोटारसायकल घसरली. यामुळे राहुल थेट प्रवरा उजव्या कालव्यात जाऊन पडला पाण्याचा प्रवाह अधिक असल्‍याने तो वाहून गेला.