होमपेज › Ahamadnagar › घर फोडून सव्वा लाखांची चोरी

घर फोडून सव्वा लाखांची चोरी

Published On: Dec 18 2017 2:27AM | Last Updated: Dec 18 2017 12:32AM

बुकमार्क करा

संगमनेर : प्रतिनिधी

बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिण्यांसह सुमारे 1 लाख 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री राजापूर शिवारात घडली.  राजापूर येथील धनलक्ष्मी पतसंस्थेचे व्यवस्थापक संजय पांडुरंग खतोडे यांच्या घरी शनिवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून प्रवेश केला व कपाटातील वीस हजार रुपये रोख तसेच पेटीमधील नव्वद हजार रुपये किंमतीची अडीच तोळे सोन्याच्या पुतळ्याची माळ, मनी मंगळसूत्र व किरकोळ सोन्या-चांदीचे दागिने आणि पाचशे रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 1 लाख 30 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. 

ही बाब सकाळी उठल्यानंतर संजय खतोडे यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ कामगार पोलिस पाटील गोकुळ खतोडे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर खतोडे यांनी ही माहिती शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक पंकज निकम  ज्ञानदेव पवार, रघुनाथ खेडकर व देशमुख घटनास्थळी येवून पंचनामा केला.  याबाबत संजय खतोडे यांनी शहर पोलिसात दिलेल्या  फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलिसांनी चोरीचा व घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पो. नि. गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. उंबरकर हे करत आहेत.