Tue, Jun 25, 2019 22:11होमपेज › Ahamadnagar › मुलीवर अत्याचार आरोपीस अटक

मुलीवर अत्याचार आरोपीस अटक

Published On: Dec 12 2017 2:03AM | Last Updated: Dec 11 2017 10:55PM

बुकमार्क करा

संगमनेर : प्रतिनिधी

एका सतरा वर्षीय मुलीवर तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन निमगावजाळी येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाने अत्याचार केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी राजेंद्र राधोजी गाडे (रा.निमगाव जाळी) याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करत त्यास अटक केली.  

एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन तिच्यावर धार्मिक प्रभाव पाडून तिची बदनामी केली. तसेच तुला परीक्षेत गुण कमी पडतील, असा धाक दाखूवन तिच्यावर जून 2016 पासून ते 1 डिसेंबर 2017 पर्यंत वेळोवेळी अत्याचार केला.  

याबाबत सदर अत्याचारित मुलीने शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र राघोजी गाडे याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदवून त्यास अटक केली आहे. आरोपीस न्यायालयाने 16 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सहा.पो.नि.गोपाळ उंबरकर, पो.नाईक शिवाजी डमाळे करीत आहेत.