Fri, Apr 19, 2019 11:57होमपेज › Ahamadnagar › शिवसेनेलाही कन्नड गीत आवडले

शिवसेनेलाही कन्नड गीत आवडले

Published On: Jan 24 2018 1:23AM | Last Updated: Jan 23 2018 11:04PMसंगमनेर : प्रतिनिधी

कर्नाटक येथे चंद्रकांतदादा पाटलांनी  मराठीत गीत न गाता कन्नड भाषेत  गीत गाऊन वेगळ्या वादाला तोंड फोडले, मात्र इतर वेळा भाजपवर तोंडसुख घेणारी, सत्तेत सहभागी असलेली शिवसेना आता गप्प का आहे, असा सवाल करून बहुदा त्यांचे कन्नड गीत शिवसेनेला आवडले असावे, अशी मार्मिक टिपण्णी विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरात पत्रकारांशी बोलताना केली. ना. विखे म्हणाले, इतर वेळेस भाजपपावर आगपाखड करणारी शिवसेना आता गप्प का आहे ?  हाच मला प्रश्‍न पडला आहे, असे सांगून पंतजलीच्या उत्पादनाबाबत राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रका संदर्भात विचारले असता ते  म्हणाले की, रामदेव बाबांसाठी एवढा ‘द्रविड प्राणायाम योग सरकार का करतयं’? असा प्रश्‍न पडला आहे.

सरकारच्या पंतजलीबाबतच्या धोरणांमुळे राज्यातील छोटा उद्योजक संपणार आहे. याचे थोडेतरी भान सरकारने ठेवावे असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. सध्याच्या  उसदरासंदर्भात शेतकरी संघटनेचा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर ना. विखे यांना विचारले असता ते म्हणाले, उसाच्या प्रश्‍नांबाबत राज्य सरकारची भूमिका ही महत्वपुर्ण असायला पाहीजे. पण तेवढी ती दिसत नाही, सरकारनेच औद्योगिक आणि घरगुती वापराच्या साखरेबाबतचे स्पष्ट धोरण घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.