Fri, Jul 19, 2019 22:45होमपेज › Ahamadnagar › संभाजी भिडे गुरुजींना जिल्हाबंदी करा

संभाजी भिडे गुरुजींना जिल्हाबंदी करा

Published On: Jun 10 2018 1:47AM | Last Updated: Jun 09 2018 11:21PMनगर : प्रतिनिधी

संभाजी भिडे हे संविधानाबाबत अपशब्द वापरून मनूस्मृतीचे समर्थन करीत असल्याने सामाजिक शांततेचा भंग होऊन मोठा उद्रेक होण्याचा धोका आहे. भिडे यांना सभा घेण्यास बंदी घालून जिल्हा बंदी करावी, अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. 

शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, संभाजी भिडे हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सभा घेऊन लोकशाही व संविधानाबाबत अपशब्द वापरत आहेत. मनूस्मृतीचे समर्थन करीत आहेत. या सर्व गोष्टी सामाजिक शांततेच्या दृष्टीने धोकादायक आहेत. सामान्य जनतेतून मोठा उद्रेक होण्याचा धोका आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. भिंडे यांना टिळक रस्त्यावरील पटेल मंगल कार्यालयात सभा घेण्यास परवानगी दिल्यास अनूचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिस प्रशासनावर राहील. भिडे यांना सभा घेण्यास परवानगी देऊ नये तसेच जिल्हा बंदी करावी, अशी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा प्रभारी संजय डहाणे, प्रा. अशोक डोंगरे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुचिता शेळके, संतोष यादव, राजू भिंगारदिवे, रेव्ह. अश्‍विन शेळके, दीपक पवार आदींच्या सह्या आहेत.