Sat, Jun 06, 2020 20:17होमपेज › Ahamadnagar › संत आणि सत्ता बरोबर असणे गरजेचे

संत आणि सत्ता बरोबर असणे गरजेचे

Published On: Jul 14 2018 8:08AM | Last Updated: Jul 13 2018 10:38PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

संत आणि सत्ता बरोबर असली तर कसलीच कमी राहणार नाही. भारताचा इतिहास बघितल्यास राजांनी संतांना आपल्या बरोबर ठेवले. राजालोक त्याकाळी निर्णय घ्यायचे तो बरोबर आहे की नाही? त्यासाठी संतांकडे जायचे, असे विचार अक्षयसागर महाराज यांनी मांडले.नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी अक्षयसागर महाराज यांचे दिगंबर जैन मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते. नगरसेवक राजेंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, भाऊसाहेब वाघ, सुनील थोरात, सागर कुर्‍हाडे यावेळी उपस्थित होते.

यावेळी अक्षयसागर महाराज  म्हणाले की, आता सत्ताधार्‍यांकडे जाणार्‍यांचा काहींना काही हेतू असतो. संत-साधू हा नेहमी जी परिस्थिती आहे तेच सांगतो, असे महाराज म्हणाले. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक गावात महिलांच्या पुढाकाराने दारुबंदी केली. पशुहत्या बंदीसाठी कार्य चालूच आहे. काही लोक आमच्याकडे पाहून म्हणतात, हे जैनांचे साधू आहेत. ‘दि’ म्हणजे दिशा होते आणि दिशाला जो वस्त्र बनवतो तोच साधू एकाचा नसतो. तो सर्वांचा असतो. यावेळी समाजाचे विश्वस्त प्रशांत आर. पाटणी, अजित पाटणी, सुभाष चुडिवाल, जितेंद्र अग्रवाल, अजय चुडिवाल, निलेश पाटणी, राहुल सोनी आदी उपस्थित होते.