Thu, Apr 25, 2019 12:16होमपेज › Ahamadnagar › साई संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन 

साई संस्थानच्या कंत्राटी कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन 

Published On: Jul 26 2018 1:30AM | Last Updated: Jul 25 2018 11:56PMशिर्डी : प्रतिनिधी

साईबाबा संस्थानमधील आऊट सोर्सिंग कर्मचार्‍यांचा इनसोसिर्र्ंगमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी साईबाबा संस्थानच्या हजारो कर्मचार्‍यांनी शिर्डी नगरपंचायतीच्या छत्रपती व्यापारी संकुलातील प्रांगणात कालपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

साईबाबा संस्थानने एम.पी.एन्टरप्राईजेस, स्पीक एन स्पेन आदी कंपन्याना कंत्राटी पद्धतीने ठेका दिलेला असून या ठेकेदारांमार्फत 1700 कर्मचारी साईबाबा संस्थान प्रशासनास पुरविण्यात येत आहे. मात्र, ऐन गुरुपौर्णिमा उत्सवात या कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केल्याने पर्यायाने ठेकेदाराला नव्याने भरती करावी लागल्याचे कंपनीच्या व्यवस्थापकांनी सांगितले.

या आंदोलनात शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, उपनगराध्यक्ष सुजीत गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष विजयराव कोते, नितिन कोते, सचिन कोते, गोपीनाथ गोंदकर, सचिन चौगुले, सचिन कोते, ताराचंद कोते, शिवाजीराजे चौधरी यांनी कर्मचार्‍यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. नगरसेवकांच्या एका शिष्टमंडळाने साईसंस्थानच्या कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांचेशी चर्चा केली. लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्ते कर्मचारी यांनी घेतली  आहे. साईसंस्थान प्रशासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून नव्याने आऊट सोर्सीग भरती सुरू केली आहे.  

याबाबत  कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल म्हणाल्या, गुरू पोर्णिमा उत्सव असल्याने गर्दीच्या काळात आंदोलन करू नये, असे आवाहन करून आंदोलन करून साईभक्त व संस्थानला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.