Thu, Jul 18, 2019 22:07होमपेज › Ahamadnagar › एसटीच्या पाच कर्मचार्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

निलंबनाविरोधात रास्तारोको

Published On: Jun 21 2018 1:29AM | Last Updated: Jun 20 2018 11:12PMशेवगाव ः प्रतिनिधी 

एसटी कर्मचार्‍यांवरील निलबंनाची कारवाई मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी शहरात सर्वपक्षीय रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

राज्यात वेतनवाढीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी 7 व 8 जून रोजी संप पुकारला होता. या आंदोलनाच्या काळात राज्यातून 1 हजार 200 कर्मचार्‍यांना निलंबित केले होते. पैकी एक हजार कर्मचार्‍यांवरील कारवाई मागे घेण्यात आली. उर्वरित 200 कर्मचार्‍यांत शेवगाव येथील 5 कर्मचार्‍यांवरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली नाही.त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. सदर निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी, म्हणून तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी इंटक संघटनेचे राज्य सचिव मुकेश तिगोटे यांनी शेवगाव येथे राज्यव्यापी संपाचा इशारा दिला होता.

याच मागणीसाठी बुधवार दि.20 रोजी शेवगाव शहरातील क्रांती चौकात अ‍ॅड. सुभाष लांडे, संजय नांगरे, पं. स. उपसभापती शिवाजी नेमाने, बाजार समिती सभापती संजय कोळगे, अ‍ॅड. शिवाजी काकडे, नगरसेवक सागर फडके, शब्बीर शेख, अरूण लांडे, प्रा.किसन चव्हाण, दत्तात्रय फुंदे, तुषार पुरनाळे, सतीश लांडे आदी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी रस्तारोको अंदोलन केले. एसटी आगारप्रमुख वासुदेव देवराज व कामगार अधिकारी बाळासाहेब एकशिंगे यांनी ही कारवाई मागे घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर अंदोलन मागे घेण्यात आले.