Sun, Nov 18, 2018 05:17होमपेज › Ahamadnagar › SP ऑफीस हल्ला प्रकरण : ३३ आरोपींना जामीन 

SP ऑफीस हल्ला प्रकरण : ३३ आरोपींना जामीन 

Published On: May 02 2018 9:30PM | Last Updated: May 02 2018 9:30PMनगर : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणातील 33 आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यापूर्वी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांची जामिनावर सुटका करण्यात आलेली आहे.

केडगाव येथील दुहेरी खून प्रकरण व पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून आमदार संग्राम जगताप यांना पळविल्याप्रकरणी आमदार कर्डिले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. यामधील ३३ जणांना आज जामीन मंजूर झाला.

जामीन झालेल्यांमध्ये शरीफ राजू शेख, आवेश जब्बार शेख, जावेद आसिफ सय्यद, इम्रान जानसाहब शेख, रियाज रमजान तांबोळी, अर्शीद अकबर सय्यद, अफजल असीर शेख, दीपक रामचंद्र घोडेकर, सारंग अंबादास पंधाडे, संजय बाबुराव गाडे, धनंजय सूर्यकांत गाडे, अनिल रमेश राऊत, दत्तात्रय सखाराम उगले, सोमनाथ भाऊसाहेब गाडळकर, अंकुश चंद्रकांत मोहीते, सचिन रामदास गवळी, साईनाथ यादव लोखंडे, सुरेश लक्ष्मण बनसोडे, अनिकेत बाबासाहेब चव्हाण, संतोष लहानू सूर्यवंशी, गहिनाथ किसन दरेकर, किशोर माणिक रोहकले, वैभव मच्छिंद्र म्हस्के, विकास पोपट झरेकर, सागर सुभाष ठोंबरे, सागर मधुकर डांगरे, काशिनाथ बबन शिंदे, संजय हरिभाऊ दिवटे, अवधूत जाधव, सिद्धार्थ राजेंद्र शेलार, मयुर राजेंद्र कटारिया, राहुल अरुण चिंतामणी, शुभम राजेंद्र राजवाळ यांचा समावेश आहे.

न्यायालयाने 33 जणांची प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचल्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच काही अटी घालण्यात आलेल्या आहेत. आरोपींच्यावतीने अ‍ॅड. महेश तवले यांनी काम पाहिले. पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणात आतापर्यंत 44 जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यातील 5 जणांना यापूर्वी जामीन झाला असून, नगरसेवक कैलास गिरवले यांचा कोठडीत असताना उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.