Sun, Oct 20, 2019 11:25होमपेज › Ahamadnagar › एसपी कार्यालय हल्ला प्रकरण : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह ४२ जणांना जामीन मंजूर

एसपी कार्यालय हल्ला प्रकरण : राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह ४२ जणांना जामीन मंजूर

Published On: May 25 2018 1:07AM | Last Updated: May 25 2018 12:22AMनगर : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह 42 जणांना न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. सोमवारी (दि. 21) कॅम्प पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना 3 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काल न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला. 

जामीन मिळालेल्यांमध्ये नगरसेवक आरिफ शेख, संपत बारस्कर, कुमार वाकळे, समद खान, निखील वारे, अविनाश घुले, दीपक सूळ, महेश बुचडे, केरप्पा हुच्चे, सय्यद अब्दुल वाहिद, अशोक रोकडे, आवी इराबत्तीन, सागर शिंदे, धिरज उर्किडे, सुनील त्रिंबके, बबलू सूर्यवींंशी, मन्सूर सय्यद, सुरेश मेहतानी, सुहास शिरसाठ, मतीन सय्यद, प्रकाश भागानगरे, वैभव ढाकणे, कुलदिप भिंगारदिवे, दत्तात्रय तापकिरे, बाबासाहेब गाडळकर, बीर ऊर्फ दिलदार सिंग, फारुक रंगरेज, चंद्रकांत औशिकर, अरविंद शिंदे, सत्यजित ढवण, वैभव जाधव, राहुल शर्मा, मयुर बांगरे, किरण पिसोरे, घनश्याम बोडखे, बाबासाहेब जपकर, राजेंद्र ससे, वैभव दारुणकर, अक्षय डाके, मयूर कुलथे, संदीप जाधव यांचा समावेश आहे.

पोलिस कोठडीची मुदत संपल्याने गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी या सर्वांना काल (दि.24) न्यायालयात हजर केले  होते. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आरोपींनी वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कविता नावंदर यांच्यासमोर त्याची सुनावणी झाली. सरकारी पक्ष व आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या सर्वांना प्रत्येकी 15 हजार रूपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.