Tue, Sep 25, 2018 14:29होमपेज › Ahamadnagar › स्टेट बँकेला १५ लाख रुपयांचा फसविले

स्टेट बँकेला १५ लाख रुपयांचा फसविले

Published On: Jul 29 2018 1:20AM | Last Updated: Jul 29 2018 12:00AMनगर : प्रतिनिधी

कर्जासाठी स्टेट बँकेला गहाण ठेवलेल्या जमिनीचे परस्पर दुसर्‍याला साठेखत करून देऊन बँकेची 15 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापकांनी भिंगार कँप पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अशोक ईश्‍वरदास जग्गी, कुणाल अशोक जग्गी, गौरव अशोक जग्गी, विजय अशोक जग्गी (सर्व रा. ईश्‍वर स्मृती, गोविंदपुरा) यांचा समावेश आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, जग्गी याने त्याच्या दुकानाची जागा गहाण ठेवून स्टेट बँकेकडून 15 लाख रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जाचे हप्ते बुडविले. बँकेने वेळोवेळी नोटीस पाठवून कर्ज भरण्याबाबत कळविले. मात्र, जग्गी कुटुंबियांनी कर्जाची परतफेड केली नाही. तसेच गहाण ठेवलेली संपत्तीबाबत कोणतीही पूर्वपरवानगी न घेता ती संपत्तीची परस्पर दुसरीकडे साठेखत केले. बँकेचे कर्ज व्याजासह बुडविण्यासाठी त्याने गहाण ठेवलेल्या संपत्तीचे दुसरीकडे साठेखत केले.  

याप्रकरणी स्टेट बँकेच्या नगरमधील मुख्य शाखेतील सहाय्यक व्यवस्थापक मेघशाम मारोतराव इंजेवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कँप पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय कवडे हे करीत आहेत.