Tue, Mar 26, 2019 01:41होमपेज › Ahamadnagar › प्लास्टिकचा वापर करून रस्ता डांबरीकरण

प्लास्टिकचा वापर करून रस्ता डांबरीकरण

Published On: Apr 28 2018 1:41AM | Last Updated: Apr 28 2018 1:19AMराहुरी : प्रतिनिधी

शहरातील ओला व सुका कचरा गोळा करताना जे वेस्टेज प्लास्टिक बाजूला करण्यात आले होते. त्याचा भुगा करून तो  रस्त्याचे डांबरीकरणात वापरण्यासाठी राहुरी नगरपालिकेने स्वतंत्र यंत्रसामग्री आणली असून त्याद्वारे प्लास्टिकचा भुगा रस्त्याचे डांबरीकरणात वापरण्यात आला आहे. अशा प्रकारचा पहिला रस्ता राहुरीत होत असल्याची माहिती नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

प्रभाग 1 मधील पोपळघट इस्टेटमध्ये 10 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे प्लस्टिक मिश्रित डांबरीकरण कामाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक बापूसाहेब कोरडे होते. 

यावेळी कारभारी मांगुडे, ठेकेदार दरे, माजी नगराध्यक्ष अनिल कासार बाळासाहेब उंडे, नगरसेवक अनिता पोपळघट, सूर्यकांत भुजाडी, दिलीप चौधरी, दशरथ पोपळघट, विलास तनपुरे, संजय साळवे, अशोक आहेर उपस्थित होते.

नगराध्यक्ष तनपुरे म्हणाले की, शहरात ओला, सुका कचरा गोळा करताना जे वेस्टेज प्लास्टिक निघाले, त्याचे ढिगचे ढिग तयार झाले. त्या वेस्टेज प्लास्टिकचे काय करायचे? असा प्रश्‍न पालिकांसमोर होता. या प्लास्टिकचे विघटन करण्यासाठी पालिकेने एक मशीन आणून त्या वेस्टेज प्लास्टिकचा भुगा केला होता. तयार करण्यात आलेला भुगा रस्त्याचे डांबरीकरणात वापरला, तर त्या रस्त्याची क्वॉलिटी चांगली राहते, म्हणून त्याचा रस्त्याचे डांबरीकरणात वापर करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांकडून रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यातून शहरातील वाड्या- वस्तीवरील रस्त्यांची कामे हाती घेणार असल्याने तनपुरे म्हणाले. यावेळी प्रकाश भुजाडी, राजेंद्र जाधव, सुनील धोंडे, एकनाथ तनपुरे, संदीप सोनवणे आदी उपस्थित होते.