Fri, May 24, 2019 06:24होमपेज › Ahamadnagar › ‘आ.कर्डिलेंवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या’

‘आ.कर्डिलेंवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या’

Published On: Apr 13 2018 1:12AM | Last Updated: Apr 12 2018 11:15PMकरंजी : वार्ताहर

आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी पाथर्डी तालुक्यातील चाळीस गावच्या ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे केली आहे.

केडगाव येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाची घटना निंदणीय असून, या हत्याकांडाची सखोल व निष्पक्षपातीपणे चौकशी होवून दोषींवर कडक कारवाई झालीच पाहीजे परंतु राजकीय द्वेषापोटी आ. कर्डिले सारख्याचे नाव घेऊन दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी पाथर्डी तालुक्यातील ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे . निवेदनावर माजी सभापती अ‍ॅड मिर्झा मनियार , पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, सरपंच संतोष शिंदे, गहिनीनाथ खाडे, दादासाहेब चोथे, युवानेते पुरूषोतम आठरे, वैभव खलाटे, बंडू पाठक, नंदकुमार लोखंडे, मनोज ससाणे, माजी सरपंच सुरेश चव्हाण, पोपटराव कराळे, सतीश कराळे, उपसरपंच रविंद्र भापसे, चेअरमन रामदास गोरे, तुकाराम वळढेकर, अ‍ॅड. गणेश शिंदे, अ‍ॅड. आत्माराम वांढेकर, पिंटू खाडे, नवनाथ आरोळे, दत्तात्रय कोरडे, अमोल गिरी, महादेव वाबळे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.

Tags : Ahamadnagar, Revoke, Crime, Offenses