Fri, Aug 23, 2019 15:11होमपेज › Ahamadnagar › मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या : खर्डे

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या : खर्डे

Published On: Jul 27 2018 1:24AM | Last Updated: Jul 27 2018 1:24AMकोल्हार : वार्ताहर

काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूची नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे प्रतिपादन डॉ. भास्करराव खर्डे यांनी केले.कोल्हार येथील स्व. माधवराव खर्डे पा. चौकात फडणवीस सरकारचा निषेध व काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अशा संयुक्‍तिक सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे, कोल्हार बुद्रुकचे उपसरपंच स्वप्निल निबे, भगवतीपूरचे सरपंच रावसाहेब खर्डे, उपसरपंच अशोक दातीर, शिवकुमार जंगम, शाम गोसावी, डॉ. संजय खर्डे, अनिल खर्डे, श्रीकांत खर्डे, भास्कर दिगंबर खर्डे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अ‍ॅड. सुरेंद्र खर्डे म्हणाले की, मराठा समाजाचे 144 आमदार असताना मराठा आरक्षणाचा प्रश्‍न अद्यापि निकाली निघत नाही. फडणवीस सरकार आरक्षण आंदोलनाला राजकीय वळण देत आहे, असे सांगून जलसमाधी घटनेकडे दुर्लक्ष करणार्‍यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली. यावेळी शिवकुमार जंगम, जावेद शेख, सुरेश पानसरे यांनी  भाषणे केली. जलसमाधी घेणार्‍या काकासाहेब शिंदे यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक शिवा निकुंभ यांनी केले. लोणीचे स. पो. नि.  रणजीत गलांडे यांना यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले. कोल्हार-भगवतीपूर गाव दिवसभर बंद ठेवण्यात आले.