Thu, Apr 25, 2019 23:23होमपेज › Ahamadnagar › अतिक्रमणे नियमित करा

अतिक्रमणे नियमित करा

Published On: Sep 02 2018 1:09AM | Last Updated: Sep 02 2018 1:09AMनगर : प्रतिनिधी

शेवगाव शहरासह तालुक्यातील सरकारी जागेवर वर्षनुवर्षे राहणार्‍या भूमिहीन लोकांची अतिक्रमणे नियमित करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी केली. याबाबत पालकमंत्री राम शिंदे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, नगरसेवक सागर फडके, अजिंक्य लांडे, विकास फलके, कृष्णा ढोरकुले, कैलास तिजोरे, साईनाथ आधाट, भाऊसाहेब लिंगे उपस्थित होते.

शेवगाव शहरासाठी महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगरोथान अंतर्गत 80 कोटी रुपये खर्च होणार्‍या पाणी पुरवठा योजनेची 10 टक्के स्वनिधींची रक्कम शासनाने भरण्याचीही मागणी करण्यात आली. शेवगाव शहरासाठी प्रस्तावित असलेल्या 80 कोटी रुपये खर्चून होणार असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या 10 रक्कम 8 कोटी रुपये नगर परिषदेने भरावयाची आहे. शासनाने अनेक पाणी योजना शासकीय निधीतून पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे 8 कोटी रुपये भुर्दंड नगरपरिषदेला न देता शासकीय निधीतूनच योजना पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. 

ना. शिंदे यांनी ही मागणी त्वतः मान्य करत यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले. तसेच शेवगाव शहरासह तालुक्यात अनेक प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थीना स्वतः जागा नसल्याने ते झोपडपट्टी, शासकीय जागेवर राहत आहेत. जागेचा सात- बारा उतारा, सिटीसर्व्हेची अट शिथिल करून 4 एप्रिल 2002 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार सरकारी जागेवरील लाभार्थीना मालकी हक्काचे उतारे  देण्याचे आदेश आहेत. त्यानुसार अतिक्रमणे नियमानुकूल करावेत अशी मागणी घुले यांनी केली.