Thu, Apr 25, 2019 23:59होमपेज › Ahamadnagar › कमी खर्चात बोंडअळीचे उच्चाटन

कमी खर्चात बोंडअळीचे उच्चाटन

Published On: Aug 25 2018 1:12AM | Last Updated: Aug 24 2018 10:31PMकोपरगाव : प्रतिनिधी

गेल्या वर्षी कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीमुळे त्रस्त झाले होते. त्यांच्या हातून सर्व पीक वाया गेले. चालू वर्षी पुन्हा काही ठिकाणी गुलाबी बोंडअळींने डोके वर काढले आहे. त्यासाठी तालुक्यातील धोंडेवाडी येथील संतोष कारभारी हळनोर या शेतकर्‍याने घरच्या घरी एक प्रयोग केला आहे. सदरच्या प्रयोगाच्या सहाय्याने बोंडअळीचे उच्चाटन होत असल्याचा दावाही या शेतकर्‍याने केला आहे. 

अगदी कमी खर्चात हा यंत्र तयार केले आहे. एका पॅनॉल बॉक्समध्ये या शेतकर्‍याने एक हजार वॅटची हॅलोजन ट्यूब वापरली आहे. या ट्यूबच्या खाली एक पसरट भांड्यात रॉकेल मिश्रित पाणी ठेवण्यात ओले आहे. हॅलोजनच्या प्रकाश झोतामुळे या ट्यूबकडे रात्रीच्या वेळी पिकांवर हल्ला चढविणांरे निशाचर कीटक याकडे आकृष्ट होतात. आकृष्ट झालेले कीटक या ट्यूबच्या खाली पसरट भांड्यात रॉकेल मिश्रित ठेवलेल्या पाण्यात पडून त्यांचा नायनाट होतो. तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव व मंडल अधिकारी मनोज सोनवणे यांनी देखील या उपक्रमाचे स्वागत केले आहे.

सध्या खरीप हंगामातील सोयाबीन कापूस पिकांवर कुठल्या न कुठल्या कीडींचा प्रादुर्भाव वाढत आहे.  त्याच्या समूळ उच्चाटनांसाठी महागडी कीटकनाशक औषधे शेतकर्‍यांना खरेदी करावी लागत आहे. फवारणी करूनही काही कीडींचा नाश होत नाही.  सुमारे सात ते आठ हजार किंमतीचा लाईट ट्रॅप शेतकर्‍यांना घ्यावा लागतो.  सोयाबीनवर सध्या सोप्डेटेरा, हेलिकॉरपा या कीडींचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. रात्रीच्या वेळी एक हजार वॅट हॅलोजनची ट्यूब पत्र्याचा डबा फोडून त्यात लावली तर त्याकडे निशाचर कीडी मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत असल्याचे निरीक्षण या शेतकर्‍यांने नोंदविले आहे. 

यासाठी तीनशे ते साडेतीनशे रूपयांचा खर्च येतो. रात्री दोन तास जरी हा लाईट ट्रॅप लावला तरी मोठया प्रमाणात कीडी जमा होतात. या शेतकर्‍यांचे पाहून तालुक्यातील अन्य ठिकाणीही काही शेतकर्‍यांनी हा प्रयोग करून पाहिला आहे. त्याचा त्यांना फायदा झाला आहे.