होमपेज › Ahamadnagar › रसिक ग्रुपचे पुरस्कार जाहीर

रसिक ग्रुपचे पुरस्कार जाहीर

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 17 2018 11:42PMनगर : प्रतिनिधी

रसिक ग्रुपच्या वतीने दिला जाणारा रसिक कलागौरव पुरस्कार जेष्ठ अभिनेते तथा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांना जाहीर झाला आहे. तर  यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांना ‘तरुणाई’ व  आनंदऋषी हॉस्पिटलला ‘कृतज्ञता’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी दिली.

वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करणारे प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा अमृतमहोत्सवी सन्मान केला जाणार आहे. तर रोहन पाटोळे, संतोष लहामगे, सी.बी.मेहरा यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे. रसिक ग्रुपच्या वतीने उद्या (दि.18) सायंकाळी  6 वाजता सावेडीतील प्रोफेसर कॉलनी जॉगिंग पार्क येथे होणार्‍या ‘रसिकोत्सव’ या गुढीपाडवा सांस्कृतिक महोत्सवात  हे पुरस्कार वितरण होणार आहे. यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन रसिक ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags : Rasik, Group, award, announcer,