होमपेज › Ahamadnagar › रंगपंचमी खेळा; पण जरा जपून!

रंगपंचमी खेळा; पण जरा जपून!

Published On: Mar 06 2018 1:52AM | Last Updated: Mar 05 2018 11:35PM डॉ. माधवी लोकेर 

रंगपंचमी होळी-रंगोत्सव दरवर्षी अतिशय उत्साहाने सर्व कुटुंबीयांसमवेत मित्र, मैत्रिणींसमवेत हा सण साजरा होतो. रंग खेळताना काही गोष्टींचे भान ठेवलेत, तर कुठलेही अघटित टाळू शकतो. आनंदाला गालबोट लागत नाही. सर्वार्थाने जीवन आनंदित, रंगमय होऊन जाते. आजकाल मात्र रंग बनवताना सिंथेटिक व रसायने वापरून रंग बनवले जातात. हे रंग बनवणे अतिशय सोपे व स्वस्त असते; पण ह्याच्यामुळे तुमच्या शरीराला प्रामुख्याने त्वचेला खूप नुकसान होते. डोळ्यांना इजा पोहोचू शकते.
रंग बनवताना वापरले जाणारे वेगवेगळे केमिकल्स,  जसे -

1) लाल रंग, गुलाल - मर्क्युरी - त्वचेचा कॅन्सर, डोळ्यांना इजा, स्मृतिभ्रंश, पॅरालीसिस.

2) काळा - लेड ऑक्साईड - किडनीला धोका, त्वचेची अ‍ॅलर्जी, मेंदूवर परिणाम.

3) हिरवा - कॉपर सल्फेड - अंधत्व, त्वचेची अ‍ॅलर्जी, त्वचेवर जखमा.

4) चंदेरी (डळर्श्रींशी)- अ‍ॅल्युमिनियम क्रोमाइड - कॅन्सरचा धोका.

5) जांभळा - क्रोमियम आयोडीन - अस्थमा, त्वचेची अ‍ॅलर्जी.

बापरे म्हणजे रंग खेळायचे नाही का आम्ही? रंगपंचमी जरुर खेळायची; पण नैसर्गिक रंगांनीच रंग घेताना त्याचा वास घेऊन बघा. तीव्र केमिकल्सचा वास येत असेल तर ते रंग टाळा, रंग पाण्यात विरघळत नसतील तर ते केमिकल्स आहेत, असा अर्थ होतो. खरखरीत रंग असेल तर त्यात काचांचा भुगा घातला असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेला कापले जाऊन जखमा होऊ शकतात.  ...तर फ्रेंडस् नैसर्गिक वनस्पतीपासून तयार झालेले रंग वापरूनच सुरक्षित होळी खेळा. रंगपंचमीच्या खूप-खूप शुभेच्छा!