Tue, May 21, 2019 04:04होमपेज › Ahamadnagar › ओल पाहून पेरणी करण्याचा ना.शिंदेंचा सल्ला

ओल पाहून पेरणी करण्याचा ना.शिंदेंचा सल्ला

Published On: Jun 24 2018 1:32AM | Last Updated: Jun 23 2018 11:16PMकर्जत ः प्रतिनिधी

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी शेतकर्‍यांना पेरते व्हाचा संदेश देत, कर्जत तालुक्यातील माहीजळगाव येथे बाबासाहेब बामणे यांच्या शेतामध्ये हातात पाभर धरत पेरणी केली. 

कर्जत तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. जिल्ह्यात सर्वत्र कमी-अधिक पाऊस झाला आहे. काही भागांमध्ये पेरणी करण्यायोग्य पाऊस पडला आहे. तालुक्यातील काही भागामध्ये अवकाळी पाऊस झाल्यावरच पेरणी करण्यात आली आहे. तिथे आज पिके उगवून पण आली आहेत. 

काही भागांमध्ये मागील तीन चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. ज्या शेतामध्ये पेरणी योग्य पाऊस पडला आहे, तेथे खरीप मूग, उडीद, बाजरीसह कडधान्याची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. शेतकर्‍यांनी बियाणे यापूर्वीच खरेदी केलेले असल्याने त्यांना फक्त चांगल्या पावसाची आणि वाफसा होण्याची प्रतीक्षा होती.

पालकमंत्री शिंदे हे तालुक्यामध्ये आले होते. यावेळी त्यांनी माहीजळगाव येथील बाबासाहेब बामणे यांच्या शेतामध्ये जाऊन स्वतः हातामध्ये पाभर धरून पेरणी केली. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांचा उत्साह वाढला आहे.  तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले राम शिंदे हे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. पण ते शेतकरी आहेत. त्यांना शेतकर्‍यांविषयी अस्था आहे, हे दाखवून दिले आहे. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांना पावसाचा अंदाज व जमिनीची ओल पाहून पेरणी करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.