Sat, Feb 16, 2019 01:14होमपेज › Ahamadnagar › सरकारी कर्मचाऱ्यांना राळेगणसिद्धीतून हाकलले

सरकारी कर्मचाऱ्यांना राळेगणसिद्धीतून हाकलले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

अहमदनगर  : पुढारी ऑनलाईन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनाचे पडसाद आता थेट राळेगणसिद्धीमध्ये उमटले आहेत. अण्णांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ग्रामस्थांनी गावातील सर्व सरकारी काम बंद केले आहे.  

यापूर्वी २०११ मध्ये अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र, आंदोलनाकडे सरकार फारसे गांभिर्याने घेत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या ६ दिवसांपासून अण्णा राजधानीतील जंतर मंतरच्या मैदानावर उपोषणाला बसले आहेत. सरकारच्या वतीने जलसंदापमंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेतली. पण, अण्णांच्या महत्त्वाच्या मागण्या सरकारने अद्याप मान्य केलेल्या नाहीत. त्यामुळे राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. 

वाचा : गर्दी जमली नाही; अण्णांचे खापर माध्यमांवर

अण्णांनी केलेल्या काही मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक दाखवली असली तरी महत्त्वाच्या मागण्यांना प्रतिसाद मिळाला नसल्याने अण्णांनी आंदोलन सुरुच ठेवले आहे. अण्णांच्या आंदोलनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आता राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अण्णा हजारेंच्या मागण्या मान्य होईपर्यंत गावात कोणतीही सरकारी सेवा नको, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. यासंदर्भात राळेगणसिद्धीचे ग्रामस्थ खासदार दिलीप गांधी यांची भेट घेणार आहेत.

वाचा : ठोस आश्‍वासन मिळाल्यास उपोषण सोडू : अण्णा हजारे

Tags : Ralegan Siddhi,  Citizen Stop Government Work, Village, Anna Hazare,  Delhi Agitation


  •