Wed, Jul 17, 2019 20:46होमपेज › Ahamadnagar › आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारा  

आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारा  

Published On: Jul 04 2018 2:11AM | Last Updated: Jul 03 2018 10:22PMनगर : प्रतिनिधी

शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी महापालिकेने शासनाकडे जागेची मागणी करावी व पुतळा लवकरात लवकर उभारावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँगे्रस सामाजिक न्याय विभागाने केली आहे. याबाबत पंधरा दिवसांत कार्यवाही न झाल्यास आंदोलन, उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँगे्रस सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त विलास वालगुडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मयूर बांगरे, सिद्धार्थ आढाव, सुभाष वाघमारे, अंजली आव्हाड, साधना बोरूडे, विजया जगताप आदी उपस्थित होते.  निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शहरात पूर्णाकृती पुतळा व्हावा, अशी भीमसैनिकांची मागणी आहे. त्यासाठी जागेची गरज लक्षात घेऊन जुन्या बसस्थानकाजवळील जिल्हा पशुवैद्यकीय दवाखान्याची बिगर वापराची 10 गुंठे जागा मिळण्यासाठी आ. संग्राम जगताप व बनसोडे यांनी वेळोवेळी मागणी केली आहे.याबाबत पूर्वी आदोंलन केले असता जागेची मागणी करण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल, असे आश्‍वासन महापालिकेने दिले होते. मात्र, आजतागायत अशी  मागणी   केलेली नाही. त्यामुळे महापालिकेने जागेची मागणी करून, तेथे लवकरात लवकर पूर्णाकृती पुतळा उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे.1