Thu, Feb 21, 2019 15:39होमपेज › Ahamadnagar › राहुरी विद्यापीठात दीड लाखांची चोरी

राहुरी विद्यापीठात दीड लाखांची चोरी

Published On: Dec 03 2017 1:10AM | Last Updated: Dec 02 2017 11:33PM

बुकमार्क करा

राहुरी : प्रतिनिधी 

राहुरी विद्यापीठातील धर्माडी जवळील कडधान्य सुधार प्रकल्पातील दीड लाख रुपये किंमतीच्या स्प्रिंंकलर संचांची काल मध्यरात्री चोरी झाली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशोधनाच्या तुलनेत सुरक्षा विभागावरच अधिक खर्च करणार्‍या राहुरी विद्यापीठाची सुरक्षा सध्या रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. अनेकदा चोर्‍यांचे प्रकार घडूनही विद्यापीठाची सुरक्षा यंत्रणा झोपेतून जागी झाली नाही. काल (दि. 1) पहाटे अज्ञात चोरट्यांनी धर्माडी विश्रामगृहाजवळच्या कडधान्य प्रकल्पात अज्ञात चोरट्यांनी हातसफाई केली. यात प्रत्येकी दीड हजार रुपये किंमतीचे 10 स्प्रिंकलर संच चोरट्यांनी लांबविले आहेत. याप्रकरणी पोलिस निरीक्षक वाघ यांनी तपासाला गती दिली आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या ज्या विभागात चोरी झाली, त्या ठिकाणी तीन सुरक्षारक्षक तैनात असतानाही ही चोरी झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.