Wed, May 22, 2019 20:18होमपेज › Ahamadnagar › बनावट ई-मेल अकौंटद्वारे फसवणूक

बनावट ई-मेल अकौंटद्वारे फसवणूक

Published On: Dec 28 2017 1:55AM | Last Updated: Dec 28 2017 1:39AM

बुकमार्क करा
राहुरी : प्रतिनिधी

राहुरी येथील रामकृष्ण गायकवाड यांना टोयोटा इनोव्हा कार विक्री करण्याचे आमिष दाखवून फेक ई-मेल अकौंटवर 6 लाख 20 हजार रुपये  पैसे भरावयास लावले. मात्र पैसे भरूनही गाडी न मिळाल्याने गायकवाड यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.   बोगस खातेदार महेश शर्मा यांचे नावाने बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा-लामटी, जबलपूर, मध्यप्रदेश येथे फेक अकौंट उघडले होते. टोयटो गाडीच्या खरेदीपोटी त्या खात्यात गायकवाड यांनी 6 लाख 20 हजार रुपये भरले होते.  मात्र त्यानंतर गाडीही नाही आणि  पैसेही नाही. अशा प्रकारे त्यांची फसवणूक झाली होती.

दरम्यान, सध्या सदर खात्यात अंदाजे 2 लाख 50 हजार किंवा जी काही रक्कम असेल ती रक्कम गायकवाड यांच्या वडीलांचे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-राहुरी येथील खात्यामध्ये मागवून घेण्याचा आदेश मिळणेकरिता राहुरी न्यायालयात दाद मागण्यात आली होती. त्याची गुण-दोषावर चौकशी होवून दि. 21 डिसेंबर 2017 रोजी राहुरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश पी. पी. देशमाने यांनी अर्जदाराचा अर्ज मान्य करून सदरची रक्कम त्यांचे वडीलांचे खात्यामध्ये ट्रान्सफर करण्याचा आदेश दिलेला आहे.