Thu, Apr 25, 2019 12:14होमपेज › Ahamadnagar › वारकरी संप्रदायाची जबाबदारी वाढली

वारकरी संप्रदायाची जबाबदारी वाढली

Published On: Jan 11 2018 1:04AM | Last Updated: Jan 10 2018 10:38PM

बुकमार्क करा
राहुरी : प्रतिनिधी

सध्या जातीयवाद वाढल्याने माणुसकीचा झरा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे आता वारकरी सांपद्रायाची जबाबदारीही वाढली आहे. सर्वांनी वारकरी सांप्रदायासोबत एकत्र येऊन देशाला घातक ठरू पाहणार्‍या जातीयवादी शक्तींचा कुटील डाव उधळून लावावा, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले.

तालुक्यातील ब्राह्मणी येथे पंढरीनाथ बानकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. शिवाजीराव कर्डिले होते. व्यासपीठावर आ.अरुण जगताप, आ.बाळासाहेब मुरकुटे, ज्येष्ठ नेते अ‍ॅड.सुभाष पाटील, डॉ. सुजय विखे, तनपुरे कारखान्याचे ज्येष्ठ संचालक नामदेवराव ढोकणे, रावसाहेब साबळे, जि.प. सदस्य शिवाजी गाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, रावसाहेब (चाचा) तनपुरे, नंदकुमार डोळस उपस्थित होते. 

ना. विखे म्हणाले, माणुसकीचा झरा कमी झाल्याने समाज बदलत असून वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत कुटुंब, घर, गाव, परिसरासाठी चांगले कार्य करणार्‍या बानकर कुटुंबाचा समाजाने आदर्श घेण्याची गरज आहे.

आ. कर्डिले म्हणाले की, ग्रामीण  मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे, यासाठी बानकर कुटुंबाने शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. राहुरी तालुक्यातील कारखाना, मुळा धरण, पाटपाणी आदी प्रश्‍नांवर ते माझ्याशी नेहमी चर्चा करतात. 

यावेळी तनपुरे कारखान्याचे उपाध्यक्ष शामराव निमसे, सभापती मनीषा ओहोळ, उपसभापती रवींद्र आढाव, उत्तमराव म्हसे, नानासाहेब ढोकणे, सत्यवान पवार, डॉ. धनंजय मेहेत्रे उपस्थित होते. दरम्यान, उद्धवगिरी महाराजांनी प्रवचनातून उपस्थितांना उपदेश केला.