Fri, Nov 16, 2018 04:39होमपेज › Ahamadnagar › मोदी व्हीलन, तर मग शिवसेना साईड व्हीलन!

मोदी व्हीलन, तर मग शिवसेना साईड व्हीलन!

Published On: Apr 24 2018 1:04AM | Last Updated: Apr 24 2018 12:11AMनगर : प्रतिनिधी

उद्धव ठाकरे मोदींना ‘व्हीलन’ म्हणतात. मग मागील साडेतीन वर्षे केंद्रात आणि राज्यात त्यांचा जो ‘डर्टी पिक्चर’ सुरू आहे, त्यात शिवसेनेची भूमिका काय आहे? मोदी ‘व्हीलन’ असतील, तर उद्धव ठाकरेंना ‘साईड व्हीलन’च म्हणावे लागेल, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली.

नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेनेच्या विरोधाचा पंचनामा करताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध म्हणजे त्यांच्यात आणि भाजपात झालेल्या एका ‘डील’चा भाग आहे. उद्धव ठाकरे म्हणतात, नाणार नाही देणार!  मग नाणारच्या तहात काय घेणार? ते उद्धव ठाकरेंनी सांगून टाकावे.

शिवसेना पक्षप्रमुख असेही म्हणतात की, मावळे विकले जात नाहीत. मावळे विकले जात नाहीत, हे खरे आहे. म्हणूनच तर शिवसेना आजवर टिकून आहे. पण आजचे स्वयंघोषित सेनापती मात्र विकले जातात, ही दुर्दैवाची बाब आहे. मुख्यमंत्र्यांना दिल्लीत कवडीची किंमत नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे करतात. असे असेल तर अशा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात तुमचे मंत्री कायम तरी कशाला राहतात? सरकारमधून बाहेर पडण्याच्या सेनेच्या इशार्‍यांची आता डबल सेंचुरी होत आली आहे, अशी बोचरी टीका करून आता तरी सेना सरकारमधून बाहेर पडणार का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.