Thu, Apr 25, 2019 23:40होमपेज › Ahamadnagar › आपत्ती व्यवस्थापनासाठी जलद कृती दल

आपत्ती व्यवस्थापनासाठी जलद कृती दल

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 13 2018 12:11AMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाकरिता जलद कृती दलाची तुकडी दाखल झाली आहे. आठवडाभर ती जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी भेटी देणार आहे. ही तुकडी सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरीक संघटना, स्वयंसेवी संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करून समस्या जाणून घेणार आहे.

पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जलद कृती दल जिल्हाभरात फिरणार आहे. या पथकाने काल (दि. 12) शहरातून संचलन केले. ही तुकडी जिल्ह्यातील विविध ठिकाणी राहत असलेल्या अल्पसंख्याक समुदायाच्या भेटी घेऊन त्यांच्या व्यवसायाची माहिती काढणे, दादागिरी, गुंडगिरी करणार्‍यांची माहिती घेण्याचे काम केले जाणार आहे. तसेच धार्मिक स्थळांना भेटी देणे, रुग्णालये, बसस्थानके, रेल्वे स्टेशन आदी गर्दीच्या ठिकाणी संचलन केले जाणार आहे. जिल्ह्यातील अतिसंवेदनशील ठिकाणी शांतता प्रस्थापित होण्यासाठी भेटी देणार आहे. या तुकडीचे नेतृत्व सहाय्यक कमांडट सुधीर सोनावळे हे करणार आहेत.