Fri, May 24, 2019 20:32होमपेज › Ahamadnagar › विद्यार्थ्यांची गुणवत्ता अभिमानास्पद : विखे

विद्यार्थ्यांची गुणवत्ता अभिमानास्पद : विखे

Published On: Jun 18 2018 1:08AM | Last Updated: Jun 18 2018 12:25AMदाढ खुर्द : वार्ताहर

आज ग्रामीण भागात कोणत्याही सोयीसुविधा नसताना मुले-मुली 90-95 टक्क्यांच्या पुढे गुण मिळवून गुणवत्ता यादीत येतात, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे गौरवोद‍्गार जि. प. अध्यक्षा  शालिनी विखे पाटील यांनी काढले.दाढ बुद्रुक येथे चाणक्य प्रतिष्ठानच्या वतीने ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता 10 वी, 12 वीमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिंनींचा  सत्कार करताना त्या बोलत होत्या. 

यावेळी प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, पं. स. सदस्या नंदा तांबे, प्रवरा कारखान्याचे संचालक प्रताप तांबे, अशोकराव गाडेकर, मुळा- प्रवरा वीज संस्थेचे संचालक देवीचंद तांबे, सरपंच पूनमताई तांबे, माजी सरपंच गोरक्षनाथ तांबे, प्रवरा बँकेचे संचालक चंपालाल पारधे, मुख्याध्यापक प्रभाकर शिंदे आदी उपस्थित होते.शालिनी विखे म्हणाल्या की, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटलांनी आशिया खंडात पहिला साखर कारखाना काढल्यामुळे येथे कारखान्याच्या माध्यमातून प्रवरा शिक्षण संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे विद्यार्थी आज परदेशात, मंत्रालयात, दिल्लीत उच्चपदांवर आहेत. मी स्वत: प्रवरेची विद्यार्थिंनी असल्याचा अभिमान आहे. आज शहरात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लाखो रुपये खर्चून खासगी क्‍लासेससह इतर सुविधा मिळतात. परंतु ग्रामीण विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधा नसतानाही गुणवत्ता यादीत येतात, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पी.एच.डी. प्राप्त केलेले डॉ. महेश  तांबे व डॉ. अविनाश बनसोडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चाणक्य प्रतिष्ठानचे सदस्य भारत तांबे, अप्पासाहेब माळवदे, संजय वाणी, आर.आर. गाडेकर उपस्थित होते. सूत्रसंचालन यमन पुलाटे यांनी, तर आभार अशोकराव दहिवळकर यांनी मानले.