Mon, Jun 17, 2019 02:10होमपेज › Ahamadnagar › स्पर्धेवर सलग दुसर्‍या वर्षीही नगरने गाजविले वर्चस्व

पुरुषोत्तम करंडक ‘सारडा’कडे

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 03 2018 11:38PMनगर : प्रतिनिधी

महाविद्यालयीन व नाट्य क्षेत्रात मानाचा व प्रतिष्ठेचा असलेल्या पुरुषोत्तम करंडकावर नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाने आपले नाव कोरले आहे. रविवार (दि. 2) रोजी पुण्यात झालेल्या अंतिम फेरीत सारडा महाविद्यालयाने सादर केलेल्या पीसीओ या नाटकाने बाजी मारत सांघिक प्रथम, दिग्दर्शनाचे प्रथम, स्त्री अभिनय प्रथम व उत्तेजनार्थ, असे पारितोषिके पटकावित पुरुषोत्तम करंडक पटकाविला.

तसेच शाहू करंडक महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेतही पेमराज सारडा महाविद्यालयाचे सादर केलेल्या ‘पीसीओ’ व ‘लाईफ आफ्टर ग्रीफ’ या दोन एकांकिकांना अनुक्रमे सांघिक द्वितीय व तृतीय पारितोषिके मिळाली. या तीन मोठ्या प्रतिष्ठेच्या व मानाचे पारितोषिक प्रथम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिळविल्याबद्दल फटाके फोडून व ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून आनंद साजरा करण्यात आला.

सारडा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘पीसीओ’ या एकांकिकेमधील विद्यार्थी महाविद्यालयात आल्यावर ढोल-ताशांच्या गजरात पुष्पवृष्टीकरुन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारापासून छोटेशी मिरवणुकही या यशस्वी विद्यार्थ्यांची काढून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष करत ढोल-ताशांच्या गजरात नाचलेही.

हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, कार्याध्यक्ष ब्रिजलाल सारडा, सचिव सुनिल रामदासी, अ‍ॅड.अनंत फडणीस, प्राचार्या डॉ.अमरजा रेखी, अविनाश बेडेकर, ज्येष्ठ रंगकर्मी पी.डी.कुलकर्णी आदींनी एकांकिकेमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी पीसीओ एकांकिकेचे दिग्दर्शक विनोद गरुड यास नटश्रेष्ठ गणपतराव गोडस पारितोषिक, मोनिका बनकर हीस उत्कृष्ट स्त्री अभिनयाचे केशवराव दाते पारितोषिक, अविष्कार ठाकूर यास अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. 

तसेच शाहू करंडक स्पर्धेत पीसीओ एकांकिने सांघिक द्वितीय, लाईफ आफ्टर ग्रीफ सांघिक तृतीय, दिग्दर्शन प्रथम - दिपक लोळगे, दिग्दर्शन द्वितीय - विनोद गरुड, स्त्री अभिनय प्रथम- वैभवी तोरडे, स्त्री अभिनय द्वितीय - मोनिका बनकर, वाचिक अभिनय प्रथम - श्रद्धा डोळसे, नेपथ प्रथम - अविनाश राऊत, प्रकाश योजना प्रथम - पृथ्वीराज केदारी, संगीत प्रथम - श्रृता भाटे आदींनी वैयक्तिक पारितोषिके मिळविल्याबद्दल सारडा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.