Tue, Mar 19, 2019 10:01होमपेज › Ahamadnagar › आई जिजाऊंचा आदर्श घ्या : पटारे

आई जिजाऊंचा आदर्श घ्या : पटारे

Published On: Jan 30 2018 11:15PM | Last Updated: Jan 30 2018 10:48PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

समाजामध्ये आदर्श माता घडविण्यासाठी आई जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन छत्रपती शिवरायांसारखे आदर्श व्यक्ती घडवावेत, असे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती दीपक पटारे यांनी केले. श्रीरामपूर येथील इच्छामनणी मंगल कार्यालयात आयोजित किशोरवयीन मुलींचे आहार, लिंग व कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी उपसभापती बाळासाहेब तोरणे, गटविकास अधिकारी मोहन जाधव, जि. प. सदस्य संगिता गांगुर्डे, शरद नवले, संगिता शिंदे, डॉ. अर्चना सोमाणी आदी उपस्थित होते. 

पटारे म्हणाले, आज सर्वत्र बेटी बचाव अभियान राबवले जात आहे. येथील रांगोळी स्पर्धेतून बेटी बचावचा संदेश समाजाला चांगल्याप्रकारे देण्याचे काम मुलींनी केले आहे. यावरच न थांबता आदर्श माता घडविण्यासाठी मुलींनी आहार आणि आरोग्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. पं. स. सदस्या कल्याणी कानडे म्हणाल्या, किशोरवयीन मुलींनी आहाराविषयी काळजी घेणे आणि भविष्यात सक्षम महिला तयार होऊन आपले सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, कला आदी क्षेत्रांमध्ये प्रगती करावी, असे सांगून आई-वडील, सासू-सासरे यांचा आदर करावा व भारतीय संस्कृती जपावी, असे मत व्यक्त केले. 

कार्यक्रमाला कारेगावचे सरपंच अनुराधा पटारे, भेर्डापुरचे सरपंच बर्डे, अ‍ॅड. गुंगले, पं. स. सदस्या वंदना मुरकुटे, बालविकास प्रकल्प अधिकारी लिप्टे आदींसह महिला मंडळाच्या सर्व सदस्या,  किशोरीवयीन मुली व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.