Wed, Sep 18, 2019 21:33होमपेज › Ahamadnagar › प्रकल्पग्रस्तांना तात्काळ मोबदला द्या : आ. जगताप

प्रकल्पग्रस्तांना तात्काळ मोबदला द्या : आ. जगताप

Published On: Jun 13 2019 1:30AM | Last Updated: Jun 13 2019 1:50AM
नगर ः प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव, चांडगाव व टाकळी लोणार आदी गावांतील शेतकर्‍यांच्या जमिनी कुकडी प्रकल्पासाठी अधिग्रहीत केल्या. परंतु अद्यापि या शेतकर्‍यांना मोबदला मिळाला नाही. मोबदला देण्यास विलंब का लागतो. असे म्हणत आ. राहुल जगताप यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. येत्या काही दिवसांत मोबदला उपलब्ध करा, असे निर्देश त्यांनी दिले.आ. जगताप यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी मात्र अवाक झाले.  

कुकडी प्रकल्पासाठी चांडगाव, शेडगाव व टाकळी लोणार या गावांतील शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या गेल्या आहेत. याबाबत अद्यापि मोबदला मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी परेशान झाले. या शेतकर्‍यांनी मंगळवारी (दि.11) आ. राहुल जगताप यांची भेट घेतली.  अधिग्रहीत जमिनीचा मोबदला मिळत नसल्याच्या तक्रारींचा पाढा त्यांनी आ. जगताप यांच्यासमोर मांडला. आ. जगताप यांनी तात्काळ काल (दि.12) शेतकर्‍यांना घेऊन नगरचे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. 

भूसंपादन अधिकारी किसवे यांच्या दालनात त्यांनी बैठक मारली. याच ठिकाणी त्यांनी भूमिअभिलेख उपअधीक्षक भांदुर्गे  व कुकडी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत मोबदला सादर करणार्‍या प्रस्तावास विलंब का झाला, याची कारणे शोधून त्यावर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला मिळावा यासाठी सादर केलेल्या प्रस्तावांमधील पूर्तता पूर्ण करण्यासाठी अधिकार्‍यांना टाईमबॉन्ड कार्यक्रम दिला. 

या कालावधीत सर्व पूर्तता पूर्ण करुन, मोबदला लवकरात लवकर कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश आ. जगताप यांनी दिले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असणा असणार्‍या या प्रश्‍नाला आता अधिकच गती मिळणार असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक बोस,  माजी नगरसेवक अख्तर  शेख व प्रकल्पग्रस्त शेतकरी  मोठया संख्येने उपस्थित होते.