Mon, Jun 24, 2019 17:54होमपेज › Ahamadnagar › त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गर्व करू नयेः नाना पटोले

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गर्व करू नयेः नाना पटोले

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 1:34AMशिर्डी : प्रतिनिधी

‘भाजपचा आवाज कोणीही किती प्रयत्न केले तर दाबू शकत नाही’ या मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या तिरंगा रॅलीतील वक्तव्याचा खरपूस समाचार काल माजी खासदार नाना पटोले यांनी घेतला. यासाठी त्यांनी रामायणातील रावणाची गोष्टीचा आधार घेतला. रावणालाही खूप गर्व झाला होता. शेवटी त्याचे गर्वहरण झाले.  त्यामुळे त्यांनी गर्व करू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता दिला.

शिर्डी जवळील निघोजमध्ये आयोजित देशव्यापी ओबीसी जनगणना परीषदेच्या कार्यक्रमासाठी आले असता उपस्थित पत्रकारांशी बोलत होते. या कार्यक्रमासाठी चंद्रशेखर कुमार, हितेंद्र ठाकूर, आ. हरीसिंग राठोड, डॉ. ज्ञानेश्‍वर गोरे, आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

पटोले म्हणाले की, आपण शासनाच्या बाबतीत थोडासा अभ्यास केला तरी हे सरकार शेतकर्‍यांच्या विरोधातील असल्याचे कळेल. त्यामुळे राज्यात 43 टक्के शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी शेतकर्‍यांना आश्‍वासन दिले होते की, आम्ही सरकार म्हणून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी पूर्ण करू. मात्र याच सरकारने सर्वोच्च न्यायालयात असे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे की, आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणार नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणात विश्‍वासघात सरकारकडून झाला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. 

देशभरात कुठलाही व्यक्ती शासनाच्या धोरणाबाबत समाधानी नाहीत. त्यामुळे थिंक टँकच्या जोरावरच समाजाच्या विकास होवू शकतो. याचा फायदा ओबीसीला येत्या 2019 च्या निवडणुकीत होणार आहे. 

देशात ओबीसी संपविण्याचा घाटः पटोले

खा. एकनाथ खडसे पक्ष सोडण्याच्या वाटेवर आहे. नारायण राणेंचीही काँग्रेस सोडल्यानंतर घुसमट वाढली आहे. अशा ओबीसी नेत्यांना पक्षातून बाहेर काढले जात आहे. यावर ते म्हणाले की, छगन भुजबळांच्या बाबतीत काय घडले हे अपणा सर्वांना माहित आहे. बहुजनातील लोकांना संपविण्याचा घाट राज्यात आणि देशात सुरू झालेला असल्याचे आरोप माजी खा. नाना पटोले यांनी केला.